Bihar Political Crisis : JDUचा भाजपशी काडीमोड, RJDच्या साथीनं मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार नितीश कुमार
Continues below advertisement
बिहारमध्ये सत्तांतर होतंय. जेडीयूचे नितीश कुमार आज आठव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपशी काडीमोड घेतल्यानं तिथलं जेडीयू-भाजप सरकार काल कोसळलं. नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा लालूप्रसाद यादव यांच्या आरजेडीची साथ घेत महागठबंधन सरकार स्थापन्याचा निर्णय घेतलाय. आज दुपारी दोन वाजता नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री बनण्याची शक्यता आहे. नितीश कुमार यांच्या भूमिकेनं बिहारमध्ये भाजपला झटका बसलाय. भाजपनं जेडीयू कमकुवत करण्याचा प्रयत्न केला असा आरोप करत नितीश कुमार यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेनेत फूट पाडून सत्ता मिळवणाऱ्या भाजपला बिहारमधली सत्ता मात्र गमवावी लागलीय.
Continues below advertisement