New Parliament House : संसद इमारतीचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावं, विरोधकांची भूमिका
सध्या देशभर चर्चा आहे ती, भारताच्या नव्या संसद भवनाची... येत्या २८ मे रोजी या संसद भवनाचं उद्घाटन होणारेय. मात्र, उद्धाटनाआधीच त्यावर वादाचं तोरण लागलंय. कारण, भाजपविरोधात अनेक पक्ष एकत्र येऊन या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर आक्षप घेतायत. त्यामुळे, नव्या संसद इमारतीच्या उद्घाटनाचा वाद चांगलाच चिघळला आहे.. २८ मे रोजी होणाऱ्या सोहळ्यावर तब्बल १९ विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकलाय... महाराष्ट्रातून ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनी देखील बहिष्कार टाकलाय.. त्यांच्या पाठोपाठ आता लालू यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलानं देखील बहिष्काराची घोषणा केली आहे. संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावं, पंतप्रधानांच्या हस्ते नाही, अशी या सर्वांची भूमिका आहे. त्यामुळे, आधी राष्ट्रपतींना सोहळ्याचं निमंत्रणच नसल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता. आता तर थेट पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनाला विरोध करत, राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी विरोधक चांगलेच आक्रमक झालेत.