New Medical College 12 जिल्ह्यात उभारणार, Girish Mahajan यांची माहिती : ABP Majha
Continues below advertisement
राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये नव्याने वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केलीय. 12 पैकी 6 जिल्हे हे विदर्भातील असून बाकी 6 उर्वरित विभागातील आहेत. विदर्भातील गडचिरोली, वाशिम, बुलडाणा, भंडारा, अमरावती आणि वर्धा या सहा जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालयांची उभारणी केली जाणार आहे. त्यानंतर मराठवाड्यातील हिंगोली आणि जालन्यात नवे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. त्यानंतर मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर, तर पश्चिम महाराष्ट्रातून अहमदनगरचा समावेश आहे.
Continues below advertisement