Sanjay Raut PC | डिसेंबरआधी राज्यात सरकार स्थापन होणार : संजय राऊत | ABP Majha
Continues below advertisement
'येत्या 5 ते 6 दिवसांत सत्तास्थापनेची प्रक्रिया पूर्ण होईल' असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना उद्या दुपारपर्यंत सत्तास्थापनेचं चित्र स्पष्ट होईल, असं देखील त्यांनी सांगितलं. दरम्यान आज संसद भवनात होणाऱ्या शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीबाबत विचारलं असता पवार-मोदी भेट नेहमी खिचडीच नसते, पवार साहेबांना शेतीबाबत अधिक माहिती आहे. पंतप्रधान देशाचे आहेत. जर एखादी समस्या असेल तर कोणीही त्यांची भेट घेऊ शकतं, असंही संजय राऊत म्हणाले.
Continues below advertisement
Tags :
Congress Shiv Sena President Rule Uddhav Thackeray BJP Devendra Fadnavis Sanjay Raut Ncp Maharashtra