Shivsena | शिवसेना एनडीएतून बाहेर, भाजपकडून अधिकृत घोषणा | ABP Majha

Continues below advertisement
शिवसेना आता सरकारचा नाही तर विरोधी पक्षाचा भाग असेल, अशी घोषणा भाजपने केली आहे. त्यामुळे शिवसेना अखेर एनडीएमधून अधिकृतरित्या बाहेर पडली आहे. सर्वपक्षीय बैठकीनंतर केंद्रीय संसदीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही घोषणा केली. विरोधी पक्षात असल्याने आता शिवसेनेच्या लोकसभा आणि राज्यसभेतील आसन व्यवस्थेतही बदल होणार आहेत. आज होणाऱ्या एनडीएच्या बैठकीत सहभागी होणार नसल्याचे शिवसेनेनं आधीच स्पष्ट केलं होतं. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये राज्यात असलेली दरी आता राष्ट्रीय पातळीवरही दिसणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram