भाजयुमोला राष्ट्रवादी युवकचं उत्तर, जय भवानी जय शिवाजी लिहिलेली 20 लाख पत्र उपराष्ट्रपतींना पाठवणार
Continues below advertisement
भारतीय जनता युवा मोर्चा अभियान राबवून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जय श्रीराम लिहिलेली दहा लाख पत्र पाठवणार आहे. आता भाजपुमोच्या या अभियानाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसही उत्तर देणार आहे. "जय भवानी जय शिवाजी" लिहून 20 लाख पोस्टकार्ड राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पाठवणार आहे.
शरद पवार यांनी राम मंदिराबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या मुंबईतील घरच्या पत्त्यावर 'जय श्रीराम' लिहिलेली 10 लाख पोस्टकार्ड राज्यभरातून पाठवली जाणार आहेत. त्यालाच उत्तर म्हणून राष्ट्रवादीकडून 20 लाख पत्रे पाठवली जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष मेहबूब शेख यांनी सांगितलं.
Continues below advertisement