NCP Vardhapan Din : शरद पवार नगरमध्ये साजरा करणार राष्ट्रवादीचा आज 25 वा वर्धापन दिन
NCP Vardhapan Din : शरद पवार नगरमध्ये साजरा करणार राष्ट्रवादीचा आज 25 वा वर्धापन दिन
हे देखील वाचा
Ajit Pawar: मानसन्मान संख्याबळावर मिळतो, अजित पवारांना विरोधी पक्षनेत्यांचा टोला
नागपूर : राष्ट्रपती भवनात नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची (PM Modi) शपथ घेतली. राज्यात मोदींच्या शपथविधीची जेवढी चर्चा आहे तेवढीच चर्चा अजित पवारांच्या गटाला एकही मंत्रिपद न मिळाल्यामुळे होत आहे. यावरुन विरोधकांनी देखील अजित पवारांना टोला लगावला आहे. मानसन्मान संख्याबळावर मिळतो, असा टोला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी (Vijay wadettiwar) केला आहे. महिन्याभरात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार माघारी परततील, असा दावा वडेट्टीवारांनी केला आहे. ते नागपुरात बोलत होते.
विजय वडेट्टीवार म्हणाले, अजित दादांना जे पाहिजे ते मिळवायचा प्रयत्न केले पण अपयश आले. कुणालाही मान सन्मान संख्याबळावर मिळतो.अजित पवारांची स्थिती सन्मान करण्यासारखी काही राहिले नाही,जे मिळेल ते खावे,राज्यमंत्रीपद मिळाले तर ठीक नाही तर तेही मिळणार नाही अशी अवस्था आहे .
उपयोग झाला की फेकून द्यायचं ही भाजपची नीती: वडेट्टीवार
भाजप सोबत घेते पण पक्ष संपवते, हे अजित पवारांना आता समजलं असेल, असा टोला काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला. उद्धव ठाकरेंना समजलं तसं ते दूर गेले. भाजप हा बेईमानांचा पक्ष आहे. उपयोग झाला की फेकून द्यायचं ही त्यांची नीती आहे, असंही वडेट्टीवार म्हणाले.