राष्ट्रवादीचे आमदार जाणार ही केवळ अफवा, उलट भाजपचे आमदारच राष्ट्रवादीत येण्यास आतुर : नवाब मलिक
राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार ही केवळ अफवा आहे. ही अफवा विरोधक पसरवत असून ही चर्चा खोटी आणि बिनबुडाची आहे. विशेष म्हणजे भाजपाचे आमदारच राष्ट्रवादीत यायला इच्छूक आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.