NCP Hasan Mushrif : हसन मुश्रीफ यांच्या कागलच्या निवासस्थानी ईडीचे अधिकारी दाखल : ABP Majha

Continues below advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ  यांच्या कागलच्या निवासस्थानी ईडीचे अधिकारी पुन्हा दाखल झाले आहेत. सलग तिसऱ्यांदा ईडीकडून ही छापेमारी सुरु आहे. पाच गाड्यांमधून ईडीचे अधिकारी मुश्रीफांच्या घरी दाखल झाले आहेत. सकाळी सात वाजल्यापासून ईडीचे अधिकारी मुश्रीफांच्या घरी आहेत. 
सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्या कथित 40 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी हसन मुश्रीफांची ईडीकडून चौकशी सुरु आहे.
दरम्यान, हसन मुश्रीफांच्या घरासमोर समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे. मुश्रीफांच्या समर्थनार्थ सगळे कार्यकर्ते घराबाहेर जमा झाले आहेत. जनतेसाठी राबणाऱ्या माणसाला त्रास दिला जात असल्याच्या भावना समर्थकांनी व्यक्त केल्या आहेत. मुश्रीफ घरात नसताना ईडीच्या अधिकाऱ्यांनी घरावर छापेमारी सुरु केली आहे. त्यामुळं कार्यकर्ते संतप्त झाले आहे.
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपानंतर गेल्या दोन महिन्यांपासून हसन मुश्रीफ ईडीच्या रडारवर आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram