Maharashtra Political Crisis : नवाब मलिक चालत नाही, मग भाजपला प्रफुल पटेल कसे चालतात? विरोधक

सत्ताधाऱ्यांमध्ये मलिकांवरून असा सावळागोंधळ सुरू असताना, सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधक पुढे सरसावले नसते तरच नवल... भाजपला नवाब मलिक चालत नाहीत, मग इक्बाल मिर्चीसोबत संबंध असणारे प्रफुल्ल पटेल कसे चालतात? असा सवाल करत, वादाला नवी फोडणी दिलीय. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी फडणवीसांना पत्र लिहलंय. तर नाना पटोले आणि संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेत, इक्बाल मिर्चीवरून आरोपांचा तडका दिलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola