Navneet Rana On Lok Sabha : आगामी लोकसभा उमेदवारीवरून नवनीत राणांचं सूचक विधान
Amravati News अमरावती : गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत असणारी अमरावती लोकसभेची (Amravati Lok Sabha Election 2024) जागा विद्यमान खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यासाठी सोडण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. एक महिला चेहरा म्हणून नवनीत राणा यांना उमेदवारी देण्याबाबत केंद्रीय पार्लमेंट बोर्डाकडून शिक्कामोर्तब झाल्याची खात्रीपूर्वक माहिती समोर आली आहे. नवनीत राणा ह्या आगामी लोकसभा निवडणुकीत युवा स्वाभिमान पार्टीकडून रिंगणात उतरणार की, भाजपच्या चिन्हावर उभ्या राहणार, अशी चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू होती. मात्र, काल रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार रवी राणा यांना तातडीने नागपूरला बोलावून घेतलं.
Tags :
Abp Majha Live Abp Maza Marathi Live ABP Majha Navneet Rana BJP Maharashtra Politics Abp Maza Live Tv Maharashtra News Live Updates #Marathi News Amaravati Loksabha