अरविंद सावंतांनी कारागृहात टाकण्याची धमकी दिल्याचा नवनीत राणांचा आरोप, सावतांकडून आरोपांचं खंडन
मुंबई : लोकसभेत शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. काल लोकसभेत सचिन वाझे आणि 100 कोटींच्या वसुलीच्या मुद्द्यावर बोलताना ठाकरे सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर खूप गंभीर आरोप केले. त्यानंतर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला कारागृहात टाकण्याची धमकी दिली, असा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.