Narendra Modi at Raj Ghat : नरेंद्र मोदी राजघाटावर दाखल, महात्मा गांधींच्या समाधीसमोर नतमस्तक

Continues below advertisement

Narendra Modi Oath Taking Ceremony: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचा आज शपथविधी होणार आहे. संध्याकाळी 7.15 वाजता नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मोदी सरकार 3.0 च्या शपथविधी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. नियमांनुसार मंत्रिमंडळात 78 मंत्री असतात. आज 40 ते 45 मंत्रि शपथ घेण्याची शक्यता आहे. यामध्ये राज्यातील 12 जणांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीएमओ कार्यालयातून आज सकाळी नव्या मंत्राना फोन जाणार आहे. त्यांना जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी बोलवण्यात येणार असून त्यांच्यासोबत चर्चा होणार आहे. मंत्रिपदाची नावे निश्चित करण्यासाठी केंद्रीय पातळीवर चर्चा आणि बैठकांचे सत्र सुरु आहे.

 मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात जातीपेक्षा प्रादेशिक समतोलावर भर दिला जाणार आहे. मंत्रिमंडळात उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम भागातल्या खासदारांना संधी मिळणार आहे. मंत्र्यांची निवड करताना त्यांचा अनुभव आणि शिक्षणही विचारात घेतले जात आहे. एनडीएमध्ये भाजपनंतर चंद्राबाबूंच्या तेलुगू देसम आणि नितीशकुमारांच्या जेडीयूचं महत्त्व वाढलं आहे. त्यामुळे तेलुगू देसमला 4, जेडीयूला 4, लोकजनशक्ती पार्टीला 2 मंत्रिपदं मिळू शकतात. तेलुगू देसम आणि जेडीयू अर्थमंत्रालयासह सभापतीपदाची मागणी करत असल्याचं समजतंय. मात्र संरक्षण, अर्थ, गृह आणि परराष्ट्र मंत्रालय भाजप स्वत:कडे ठेवणार असल्याची माहिती आहे.

राज्यातील कोणत्या नेत्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार ?

एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एनडीएसोबत आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांना आज मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेनाला चार मंत्रिपदे मिळू शकतात. राज्यातील भाजपचे चार नेते मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. भाजपकडून नितीन गडकरी, पीयूष गोयल, अशोक चव्हाण आणि नारायण राणे यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर शिवसेनकडून मिलिंद देवरा, संदीपान भुमरे, प्रतापराव जाधव आणि श्रीरंग बारणे यांची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल पटेल यांचं नाव आघाडीवर आहे. रिपाइंकडून रामदास आठवले हे मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram