Chandrababu नायडू यांच्या TDP पक्षाने पाडले होते BJP चे सरकार! यावेळी काय होणार?
TDP च्या नेत्यांनी भाजपचे सर्वोच्च नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत जे केलं ते कदाचित भाजपचे लोकं विसरले असतील...पण इतिहासात असं काय घडलं होतं की, भाजप टीडीपीला लोकसभा अध्यक्षपद देण्यापासून सावध भूमिका घेतेय...
भाजप आणि त्यांच्या सहकारी पक्षाने एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदींची सभागृह नेतेपदी निवड केली. त्यामुळे मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनणार आहेत. मात्र मोदींच्या या सरकारचं महत्त्व एनडीएतील चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या भूमिकेवर अवलंबून राहणार आहे.
एनडीएच्या घटक पक्षांमध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीनं सर्वात महत्त्वाची अट ठेवली ती म्हणजे लोकसभा अध्यक्षपद. सरकारला पाठिंबा दिल्याबद्दल टीडीपीला केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदे आणि लोकसभा अध्यक्षपद हवं अशी मागणी त्यांनी केली आहे.
हे देखील वाचा
Nilesh Lanke on Majha Katta : माजी आमदाराच्या पायावरुन गाडी गेली, शिवसेनेतून हकालपट्टी कशी झाली? निलेश लंकेंनी सांगितला उद्धव ठाकरेंचा किस्सा
Nilesh Lanke on Majha Katta : "मी तालुकाप्रमुख होतो, गावात सांगितलं जायचं याचं नाव टाकू नका. याला निमंत्रित करु नका. मी गेलो की, माझ्याकडे दुर्लक्ष करायचे. त्यामुळे आमच्यात दरी निर्माण झाली. त्यानंतर जिल्हा नियोजनची निवडणूक लागली. मी शिवसेनेला म्हटलं. मला जिल्हा नियोजनची उमेदवारी द्या. पक्ष म्हटला तुमच्या आमदारांना आम्हाला सांगायला लावा. आमच्याप्रमुख जिल्हाप्रमुख गावडे सर होते. त्यांना आमदारांना डावलून निर्णय घेता येत नव्हतं. त्यामुळं आम्हाला आमदारांना सांगायचं नव्हतं. आमदारमध्ये आणि माझ्यात अंतर पडलं. त्यामुळं सूचक म्हणून कोणी सही करत नव्हते. मी राष्ट्रवादीच्या एकाची सही घेतली. जिल्हा नियोजनची ताकदीने निवडणूक लढवली. शेवटी अशी वेळ आली की, शिवसेनेला उमेदवार नव्हता. माझी यंत्रणा रात्री बारानंतर सुरु होते. त्यावेळी सर्वांत जास्त जिल्हा नियोजनला निवडून आलो होतो. अधिकारी थांबायचे निलेश लंके कोण आहे हे पाहायला. त्यानंतर आवटींनी माझ्यासोबत पॅचअपचा प्रयत्न केला, असे निलेश लंके म्हणाले. ते माझा कट्टावर बोलत होते.