Narayan Rane : संजय राऊतांनी शिवसेना संपवण्यासाठी राष्ट्रवादीची सुपारी घेतली , नारायण राणेंचा हल्लाबोल
Narayan Rane : संजय राऊत यांची नजर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीवर आहे. संजय राऊत शिवसेनेचे नाही तर शिवसेना संपवण्यासाठी राष्ट्रवादीची सुपारी घेतली आहे, असे म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तसेच 15 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय परिषदेला उत्तर देण्यासाठी आजची पत्रकार परिषद घेतली आहे, असा टोला देखील नारायण राणेंना संजय राऊत यांना यावेळी दिला आहे.