Narayan Rane : मी असं काय बोललो ? मुख्यमंत्री थोबाड फोडण्याची भाषा करतात त्याचं काय? नारायण राणेंचा सवाल
तुम्ही कोणीही माझं काहीही करू शकत नाही. तुमच्या कोणत्याही प्रतिक्रियेला मी घाबरत नाही. तुम्हा सर्वांना मी आतापर्यंत पुरुन उरलो आहे. शिवसेना वाढवण्यात माझा मोठा वाटा आहे. तेव्हा आताचे कोणी नव्हते. कुठे काय करत होते माहिती नाही. त्यामुळे त्यांना जे काही करायचं ते करुदे, अशी भूमिका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी जनआशीर्वाद यात्रा सुरुच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आज नारायण राणे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. यानंतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.
Tags :
Maharashtra CM Uddhav Thackeray Latest Marathi News Abp Majha Maharashtra Politics Maharashtra Government Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Narayan Rane Anil Parab ABP Majha ABP Majha Video