Narayan Rane : 'राणेंच्या रुपानं राडेबाज विकृतीचा शिरकाव', खासदार Vinayak Raut यांची टीका
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे झालेल्या पोलिसांच्या कारवाईनंतर नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा आजपासून पुन्हा रत्नागिरी शहरातून सुरू झाली. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर बोलताना शिवसेनेवर टीका करण्याचा मोह त्यांना आवरला नाही आणि शिवसेना ललकारत जुनी प्रकरण उकरून काढण्याविषयी त्यांनी भाष्य केले.
दरम्यान, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आणि राणेंच्या रुपानं राडेबाज विकृतीचा शिरकाव झाल्या असे म्हणत राणेंच्या वक्तव्याचा खरपूस समाचार सुद्धा घेतला.
Tags :
Shivsena Latest Marathi News Abp Majha Maharashtra Politics Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Narayan Rane Vinayak Raut Jan Ashirwad Yatra ABP Majha Shivsena Vs Bjp ABP Majha Video