Narayan Rane यांना हायकोर्टाने 10 लाखांचा दंड ठोठवत दणका दिला, अवैध बांधकामावर कारवाईचे आदेश
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना हायकोर्टाने १० लाखांचा दंड ठोठावत दणका दिलाय... मुंबईत जुहू इथल्या अधीश बंगल्याबाबत कोणताही दिलासा देण्यास कोर्टाने नकार दिलाय.. या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम नियमित करण्याकरता राणेंनी आपल्या कंपनीमार्फत पाठवलेल्या दुसऱ्या अर्जाबाबतची याचिका हायकोर्टानं फेटाळलीय... तसंच एकदा निर्देश देऊनही पुन्हा त्याच मुदद्यावर याचिका केल्याबद्दल राणेंच्या कंपनीला १० लाखांचा दंडही ठोठावण्यात आलाय... इतकंच नव्हे तर यचा अवैध बांधकामावर दोन आठवड्यात कारवाई करत कोर्टात अहवाल सादर करण्याचे निर्देशही पालिका प्रशासनाला देण्यात आलेत...