Narayan Rane Full PC : कोणी आडवे आले तर त्यांच्यावर पाय देऊन पुढे जाऊ - नारायण राणे

Continues below advertisement

Narayan Rane Full PC : कोणी आडवे आले तर त्यांच्यावर पाय देऊन पुढे जाऊ - नारायण राणे

हे देखील वाचा

''मला धक्काच बसला, 15 वर्षांपूर्वी मी आवाज उठवला होता''; शिखर बँक याचिकेबाबत अण्णा हजारेंचा गौप्यस्फोट

अहमदनगर : लोकसभा निवडणुकांतील भाजपच्या पराभवानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठांनी अजित पवारांकडे बोट दाखवले आहे. गरज नसताना अजित पवारांना (Ajit Pawar) सोबत घेतल्यामुळे भाजपला फटका बसल्याचे संघाच्या ऑर्गनायझर या मासिकातून म्हटले आहे. एकीकडे निवडणूक निकालामुळे टीकेचे धनी होत असलेल्या अजित पवारांच्या अडचणीत आणखी एक वाढ झाल्याचे वृत्त समोर आले. शिखर बँक घोटाळा प्रकरणाबाबत (Shikhar Bank Scam Case) ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी क्लोजर रिपोर्टवर आक्षेप घेत याचिका दाखल केल्याचे सांगण्यात आले होते. विशेष म्हणजे या वृत्तानंतर माध्यमांत अनेक नेतेमंडळींनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या. मात्र, आता अण्णा हजारेंनीच या वृत्तावर आक्षेप घेतला आहे. याप्रकरणी माझा कुठलाही संबंध नसून माझ्या नावाचा दुरुपयोग करुन काही लोक स्वार्थ साधत असल्याचं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे

शिखर बँक घोटाळा प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारे यांनी आक्षेप घेत निषेध याचिका दाखल केल्याचे वृत्त माध्यमांत आल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. अजित पवारांना लक्ष्य केलं जात असल्याचं काहींनी म्हटलं. शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अण्णांनाच लक्ष्य केलं होतं. मात्र, अण्णांनी क्लोजर रिपोर्ट याचिकांसदर्भात मोठा गौप्यस्फोट केला आहे. मी कुठलीही याचिका दाखल केली नसल्याचं अण्णांनी म्हटलं.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram