Narayan Rane | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कार्यपद्धतीला कंटाळले आहेत, नारायण राणेंचा काँग्रेसवर निशाणा
काँग्रेसमध्ये सर्व ज्येष्ठ नेते काँग्रेसच्या कार्यपद्धतीला कंटाळलेत, तर तरुण फळीतील नेत्यांमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता नाही. सर्वांनी नेतृत्वावर एकमत करून वादावर पडदा टाकला तरच काँग्रेसला भवितव्य अन्यथा पक्षासमोर अंधक्कार येईल असं विधान नारायण राणे यांनी केलंय. मी पक्षात असताना चुकीच्या कार्यपद्धतीवर अनेकदा बोट ठेवलं पण त्यावेळेस माझ्या विरोधात भूमिका घेण्यात आली. मात्र आता अनेक नेते तीच भूमिका मांडत आहेत, असंही ते म्हणाले.