Narayan Rane Adhish Bungalow : केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या बंगल्यावर कारवाईचे कोर्टाचे निर्देश

 केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जुहू येथील 'अधीश' बंगल्याबाबत कोणताही दिलासा देण्यास हायकोर्टानं नकार दिला आहे. या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम नियमित करण्याकरता राणेंनी आपल्या कंपनीमार्फत पाठवलेल्या दुस-या अर्जाबाबतची याचिका हायकोर्टानं फेटाळून लावली आहे. तसेच एकदा निर्दश देऊनही पुन्हा त्याच मुद्यावर याचिका केल्याबद्दल राणेंच्या कंपनीला 10 लाखांचा दंडही ठोठावला आहे. इतकंच नव्हे तर या बेकायदेशीर बांधकामावर दोन आठवड्यांत कारवाई करत त्याचा अहवाल कोर्टात सादर करण्याचे निर्देश पालिका प्रशासनाला दिले आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola