Nana Patole : प्रदेशाध्यक्षपदाचा अंतिम निर्णय राहुल गांधी घेतील : नाना पटोले : ABP Majha

Continues below advertisement

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी नाना पटोले आणि अशोक चव्हाण यांच्यात रस्सीखेच सुरु असल्याच्या चर्चा सध्या सुरु झाल्यात.. याचं कारण म्हणजे या दोन्ही नेत्यांचे दिल्ली दौरे.. अशोक चव्हाण यांनी दिल्लीचा दौरा केल्यानंतर त्यांच्यापाठोपाठ नाना पटोलेंनीही दिल्लीवारी केलीये.. दोन दिवसांपासून पटोले दिल्लीत ठाण मांडून आहेत.. प्रदेशाध्यक्ष पदासाठी अशोक चव्हाणांचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत.. तर प्रदेशाध्यक्ष पद टिकवण्यासाठी नाना पटोलेंची धावपळ सुरु असल्याची चर्चा सुरु आहे... यावर अंतिम निर्णय राहुल गांधी घेणार आहेत.. त्यामुळे आगामी काळात प्रदेशाध्यक्षपद नाना पटोले टिकवणार की अशोक चव्हाण बाजी मारणार याकडे लक्ष लागलंय... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram