Nana Patole On Ambedkar : आम्ही दोस्तीचा हात पुढं करायला अजूनही तयार, नाना पटोलेंची आंबेडकरांना ऑफर

Continues below advertisement

Lok Sabha Election 2024 : वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahujan Aghadi) पाहिजे असलेल्या दोन जागा देण्यास तयार असून, अजूनही आम्ही तुमच्याकडे दोस्तीचा हात पुढं करायला तयार असल्याचे वक्तव्य नाना पटोले (Nana Patole) यांनी केले आहेत. महाविकास आघाडीशी जागावाटपाची ( Maha Vikas Aghadi Seat Sharing) चर्चा सुरु असतानाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) बाहेर पडण्याची घोषणा केली. त्यानंतर आंबेडकर यांनी वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघातील (Lok Sabha Constituency) आपले उमेदवारांच्या नावाची घोषणा देखील केली. मात्र, अजूनही वेळ गेली नसून, उमेदवारी मागे घेण्याच्या तारखेपर्यंत आम्ही दोस्तीचा हात पुढं करायला तयार असल्याचे म्हणत नाना पटोले यांनी एक पाऊल मागे घेतल्याचे पाहायला मिळत आहे. पटोले हे भंडाऱ्यात (Bhandara) बोलत होते. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram