Narendra Modi : 21 मोठ्या बेटांचं नामकरण, बेटांना परमवीर चक्र विजेत्यांची नाव
abp majha web team
Updated at:
23 Jan 2023 02:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppParakram Diwas 2023: नेताजी सुभाषचंद्र बोस (Netaji Subhas Chandra Bose) यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज अंदमान आणि निकोबारमधील (Andaman and Nicobar) 21 मोठ्या बेटांचं नामकरण केलं आहे. विशेष म्हणजे, ही बेटे परमवीर चक्र विजेत्यांच्या (Param Vir Chakra) नावानं ओळखली जातील. यावेळी पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात सहभाग घेतला. दरम्यान, गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) 126 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोर्ट ब्लेअरला पोहोचले आहेत.