Winter Assembly Session:आज कुठल्या मुद्यांवरून अधिवेशन गाजणार ?ऐन थंडीत नागपूर तापणार? सविस्तर आढावा

Continues below advertisement

आज अधिवेशनात कुठले मुद्दे गाजणार?,  विरोधक कुठल्या मुद्द्यांवरुन अधिवेशनात सरकारला धारेवर धरणार यासंदर्भात सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्रतिनिधी वेदांत नेब आणि सत्ताधाऱ्यांची रणनीती काय असेल याचा आढावा ,... 

Maharashtra Assembly Winter Session 2023: विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला (Maharashtra Assembly Winter Session) आजपासून नागपुरातून (Nagpur) सुरुवात होणार आहे. आजपासून पुढचे 10 दिवस महाराष्ट्राची (Maharashtra News) उपराजधानी नागपुरातलं वातावरण तापणार आहे. पुढचे 10 दिवस नागपूर राजकीय घडामोडींचं केंद्र असेल. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरुन जुंपण्याची शक्यता आहे.

मराठा आरक्षण, अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात झालेल्या ड्रग्ज कारवाया, ड्रग्जचे कारखाने, आरोग्य विभागातील कथित घोटाळ्याचे आरोप या सर्व विषयांवर अधिवेशनात (Winter Assembly Session 2023) चर्चा होण्याची शक्यता आहे. या मुद्द्यांवरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे. दरम्यान, अवकाळीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकार काही घोषणा करतं का? आणि मराठा आरक्षणासंदर्भात सरकार काही निर्णय घेतं का? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram