Sharad Pawar | विदर्भ दौऱ्याच्या दुसरा दिवशी शरद पवार अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार | ABP Majha
Continues below advertisement
अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाची पाहणी कऱण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विदर्भ दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. काल नुकसानाची पाहणी केल्यानंतर आज पवार नागपुरात अधिकाऱ्यांसोबत चर्चा करतील. काल त्यांनी नागपूर जिल्ह्यातील चारगावमध्ये पवारांनी शेतामध्ये जाऊन नुकसान झालेल्या कापसाची पाहणी केली. ((कापूस खराब झाला असून तो कोणीच खरेदी करत नाही, अशी व्यथा शेतकऱ्यांनी मांडलीय. शिवाय अद्याप सरकार स्थापन न झाल्याने कापूस खरेदी केंद्र सुरु झालं नसल्याचंही शेतकऱ्यांनी सांगितलं. यावेळी आशिष देशमुख, आमदार अनिल देशमुख आणि प्रकाश गजभिये पवारांसोबत होते.
Continues below advertisement