MVA On Prakash Ambedkar : आज घाईत कोणताही निर्णय घेऊ नका, मविआची आंबेडकरांना विनंती : ABP Majha
Continues below advertisement
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आज महाविकास आघाडीसंदर्भात भूमिका जाहीर करणार होते. शिवाय तिसऱ्या आघाडीची घोषणा करण्याचीही शक्यता होती. मात्र, आज घाईत कोणताही निर्णय घेऊ नका अशी विनंती महाविकास आघाडीने प्रकाश आंबेडकरांना केली आहे. त्यामुळे मविआ आणि वंचितमध्ये आज नव्याने चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मविआ आंबेडकरांना नवा प्रस्ताव देणार असल्याची शक्यता आहे. आंबेडकरांनी मविआची विनंती मान्य करत आजऐवजी उद्या भूमिका जाहीर करण्याचं ठरवल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. यासंदर्भात अधिक माहिती देतायेत अकोल्याचे प्रतिनिधी उमेश अलोणे...
Continues below advertisement