Maharashtra Govt Formation | उद्धव ठाकरे शपथविधीसाठी राज ठाकरेंना निमंत्रण देण्याची शक्यता | ABP Majha
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे 19 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. राज्याला दोन मुख्यमंत्री देणाऱ्या ठाकरे घराण्यातून पहिल्यांदाच कुणी व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहे. मुंबईत शिवतीर्थावर उद्या (28 नोव्हेंबर) संध्याकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. या शपथविधीला संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र दिसण्याची शक्यता आहे. कारण उद्धव ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना शपथविधीसाठी निमंत्रण देण्याची चर्चा रंगली आहे. या निमंत्रणामुळे दोन्ही भावांमधील दूरावा कमी होईल असं म्हटलं जात आहे.
Tags :
Oath Taking Ceremony Maharastra Govt Formation Maharashtra Government Formation MNS Uddhav Thackeray Raj Thackeray Maharashtra Politics Shiv Sena