Thackeray Brothers Banner : शिवाजी पार्कातला ठाकरे बंधूंचा बॅनर काढला, खोडसाळपणाचा आरोप

Continues below advertisement

मुंबई: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी देशभरात सुरू झाली असून, मुंबईतील राजकीय वातावरणही आता तापू लागले आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबईच्या रस्त्यांवर जोरदार बॅनरबाजी सुरू झाली आहे. या बॅनरबाजीत सर्वात लक्षवेधी ठरले आहेत, ते ठाकरे बंधूंचे एकत्रित बॅनर! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे केंद्रस्थान असलेल्या शिवाजी पार्क परिसरातील सेना भवनजवळ हे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या दोन्ही बंधूंचा फोटो आहे.

विशेष म्हणजे, या बॅनरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या खांद्यावर हात टाकलेला एक जुना आणि भावनिक फोटो लावण्यात आला आहे.

या बॅनरचा आशयही तितकाच प्रभावी आहे. बॅनरवर "ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक" असा थेट संदेश देण्यात आला आहे.

या बॅनरबाजीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. निवडणुका जवळ असताना, दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र दर्शवणाऱ्या या बॅनरचा नेमका अर्थ काय, युतीचे संकेत आहेत का, अशा अनेक तर्कवितर्कांना जोर आला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola