MNS Adhivation | प्रयत्न चांगला, पण स्वभावातील दोष बाजूला करणं गरजेचं : राम कदम | ABP Majha

Continues below advertisement
येत्या 23 जानेवारीला म्हणजे उद्याच राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं मुंबईत अधिवेशन होणार आहे. आणि या अधिवेशनानंतर राज ठाकरे आपल्या राजकारणाची कूस बदलू शकतात. कारण राज ठाकरेंचा पुढील अजेंडा भगवा आहे. राज ठाकरेंच्या पक्षाचे नवीन ध्वज एबीपी माझाला मिळाले आहेत. मनसेनं निवडणूक आयोगाला दोन ध्वज पाठवले आहेत. एकावर पक्षाचं निवडणूक चिन्ह असलेलं इंजिन आहे तर दुसऱ्यावर शिवमुद्रा आहे. विशेष म्हणजे दोन्ही झेंड्यात फक्त आणि फक्त भगव्या रंगाला स्थान आहे. यापूर्वीच्या मनसेच्या झेंड्यात पाचरंग होते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram