Mumbai phone tapping case IPS Rashmi Shukla यांचा दोषमुक्तीसाठी अर्ज : ABP Majha
टेलिफोन टॅपिंग प्रकरणी आरोप असलेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी दोषमुक्तीसाठी न्यायालयात अर्ज केलाय.. न्यायालयाने रश्मी शुक्ला यांच्या अर्जावर मुंबई पोलिसांना उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी राजीव जैन यांच्या तक्रारीनंतर 4 मार्च रोजी कुलाबा पोलीस ठाण्यात शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र फौजदारी कारवाईसाठी मुंबई पोलीसांनी केंद्र सरकारची परवानगी घेतली नसल्याचा शुक्ला यांचा दावा आहे.