Congres NCP PC | सरकार झालं तर ते कसं चालेल हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत पुढे जाणार नाही : शरद पवार | ABP Majha
Continues below advertisement
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने संयुक्त पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आधी चर्चा होईल. आमच्या गोष्टी स्पष्ट झाल्यानंतर पुढे शिवसेनेसोबत चर्चा करु, असं काँग्रेस नेते अहमत पटेल यांनी म्हटलं आहे. तर राज्यपालांनी आम्हाला भरपूर वेळ दिला आहे, आता आम्ही निवांत निर्णय घेऊ, असं शरद पवारांनी म्हटलं आहे. राज्यपालांनी आम्हाला भरपूर वेळ दिला आहे. सर्वांशी चर्चा करुन कॉमन मिनिमम कार्यक्रम ठरवला जाईल. सरकार झालं तर ते कसं चालेल हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत पुढे जाणार नाही. सरकार बनवायचं आहे की नाही, बनवायचं असेल तर कोणत्या मुद्यांवर सरकार स्थापन करायचं याची चर्चा केली जाईल. राज्यपालांनी आता खूप वेळ दिलाय त्यामुळे काही घाई नाही, निवांत निर्णय घेऊ, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
Continues below advertisement
Tags :
Congress Leaders Presidents Rule Maharashtra Crisis Maharashtra Governor Bharatiya Janata Party Maharashtra Government Formation Shivsena Ncp Mumbai Maharashtra Congress