MNS New Flag | राज ठाकरेंकडून मनसेच्या नव्या भगव्या ध्वजाचं अनावरण, झेंड्यावर राजमुद्रा

Continues below advertisement
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अखेर आपला ध्वज बदलला आहे. मुंबईत गोरेगावमधील नेस्को मैदानात मनसेचं पहिलं राज्यव्यापी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाचं उद्घाटन झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नव्या ध्वजाचं अनावरण केलं. मनसेच्या नव्या झेंड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा आहे. तसंच झेंड्यात पूर्णपणे भगव्या रंगाला स्थान देण्यात आलं आहे. स्थापनेनंतर तब्बल 14 वर्षांनी मनसेच्या ध्वजाचा रंग आणि राजकारण दोन्हीही बदललं आहे. दरम्यान राज ठाकरे आज संध्याकाळी पक्षाचा अजेंडाही स्पष्ट करणार आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram