Bacchu Kadu | 'स्मशानात राहून जनतेची कामे करु', स्मशानाजवळील बंगला मिळाल्याने बच्चू कडू नाराज | ABP Majha
Continues below advertisement
आक्रमक नेते म्हणून ओळख असलेले राज्यमंत्री बच्चू कडू हे नाराज असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या नाराजीचे कारण आहे त्यांना मिळालेला बंगला. हा बंगला स्मशानभूमीच्या शेजारी असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बच्चू कडू यांनी त्यांच्याकडे येणाऱ्या अपंग आणि रुग्णांना सोईचे होईल अशा प्रकारचे मंत्रालयातील पहिल्या मजल्यावर कार्यालय तसेच मंत्रालया शेजारील बंगल्याची मागणी केली होती. परंतु काही अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक विधानभवनात कार्यालय आणि मलबार हिल येथील स्मशानाजवळील रॉकी हिल 1202 हा फ्लॅट दिला असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.
Continues below advertisement