Mahavikas Aaghadi | महाविकासआघाडीच्या 162 आमदारांच्या सह्यांचं पत्र एबीपी माझाच्या हाती | ABP Majha
Continues below advertisement
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षाच्या महाविकास आघाडीच्या 162 आमदारांच्या सह्यांचं पत्र एबीपी माझाच्या हाती लागलं आहे. शिवसेनेच्या सर्व 56, काँग्रेसच्या सर्व 44 आणि राष्ट्रवादीच्या 51 पैकी 50 आमदारांच्या सह्या या पत्रात आहेत. तर आमदार नरहरी झिरवळ यांची स्वाक्षरी नसली तरी त्यांचं पाठिंब्याचं पत्र जोडलं आहे. शिवाय दहा अपक्ष आणि अन्य आमदारांच्या सह्यांचा यात समावेश आहे.
Continues below advertisement