Maharashtra Cabinet Expansion | 30 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्ताराचा नवा मुहूर्त | ABP Majha
Continues below advertisement
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा विस्तार सोमवार, 30 डिसेंबरला दुपारी 1 वाजता होणार आहे. दैनिक सामनानं यासंदर्भातलं वृत्त दिलंय. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सोमवारी सायंकाळी ‘सह्याद्री’ अतिथीगृह येथे भेट घेऊन सुमारे तासभर चर्चा केली. हिवाळी अधिवेशनानंतर दोन दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होणार अशी विधानं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केली जात होती. मात्र मंत्रिमंडळ विस्तार आणखी लांबणीवर पडला. . काँग्रेसकडून मंत्रिमंडळात पाठवण्यात येणाऱ्या नेत्यांची अंतिम यादी तयार नसल्यानं मंत्रिमंडळ रखडत असल्याचं कळतंय.. याशिवाय गृहखात्यावरुनही शिवसेना आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच असल्याची माहिती आहे.
Continues below advertisement