Maharashtra Govt Formation | मुख्यमंत्री शिवसेनेचा तर काँग्रेस-राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपद, शिवसेनेचा सत्तावाटपाचा प्रस्ताव : सूत्र | ABP Majha

Continues below advertisement
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात काल (14 नोव्हेंबर) फॉर्म्युल्याच्या मसुद्यावर चर्चा झाली. अंतिम निर्णय सोनिय गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मसुद्यानुसार, शिवसेनेने ठेवलेल्या प्रस्तावात मुख्यमंत्री सेनेचा असेल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अडीच-अडीच वर्ष उपमुख्यमंत्रीपद दिलं जाईल. याशिवाय गृहमंत्रालय, विधानसभा उपाध्यपद राष्ट्रवादीला, महसूल, विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला, तर अर्थ, नगरविकास तसंच विधानपरिषद अध्यक्षपद शिवसेनेला मिळेल.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram