Mumbai : फडणवीसांचा नवा पेन ड्राइव्ह बॉम्ब, दाऊदशी संबंधित व्यक्ती वफ्फ बोर्डावर : ABP Majha

Continues below advertisement

काल विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक नवा पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडला... महाविकास आघाडी सरकार आणि वक्फ बोर्डावरही त्यांनी गंभीर आरोप केले. दाऊदशी संबंधित असलेले डॉ. मुद्दस्सिर लांबे यांना अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी वक्फ बोर्डावर घेतल्याचा आरोप फडणवीसांनी केला. दाऊदशी संबधित संवादाचा पेनड्राईव्ह फडणवीसांनी विधानसभेत सादर केला... दरम्यान फडणवीसांनी केलेल्या आरोपांवर नवाब मलिकांची मुलगी सना मलिक शेख यांनी उत्तर दिलंय... मुदस्सिर लांबे यांची नियुक्ती मलिकांच्या काळात नव्हे तर फडणवीस सरकारच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये झालीय असा आरोप सना मलिक शेख यांनी केलीय...  मुदस्सिर लांबे यांचे फडणवीस यांच्यासोबतचे फोटो देखील त्यांनी शेयर केले आहेत.. वक्फ बोर्डावर मुदस्सिर  लांबे यांची नियुक्ती 13 सप्टेंबर 2019  ला आणि  नवाब मलिकांकडे हे खाते जानेवारी 2020 च्या पहिल्या आठवड्यात आले असं त्यांनी म्हटलंय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram