Uddhav Thackeray | शेतकरी पुत्र अध्यक्ष झाल्याचा आनंद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे | ABP Majha

महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपकडून किसान कथोरे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पटोले यांची बिनविरोध निवड झाली आहे. महाविकास आघाडीला काल बहुमत सिद्ध करुन पहिली परीक्षा पास झाल्यानंतर आज विधानसभा अध्यक्षपदाच्या परीक्षेचा सामना करावा लागणार होता. अर्थातच काल 169 मतांनी बहुमत सिद्ध केल्याने विधानसभा अध्यक्षपदाचा 'सामना' देखील महाविकास आघाडीच जिंकणार अशी दाट शक्यता होती. मात्र त्याआधीच भाजपने माघार घेतल्याने पटोले यांची निवड झाली आहे. गुप्त मतदानाने होणारी विधानसभा अध्यक्षाची निवडणूक खुल्या पद्धतीने घेण्याची महाविकास आघाडीची रणनिती असल्याची माहिती मिळाली होती. तसा प्रस्ताव आधी विधानसभेत मांडला जाण्याची शक्यता होती. मात्र आधीच अध्यक्षांची निवड बिनविरोध झाली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola