Majha Impact | मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष तात्काळ सुरु करा, शिवसेना, राष्ट्रवादीची मागणी | ABP Majha
Continues below advertisement
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष बंद असल्याची बातमी एबीपी माझाने दाखवल्यानंतर आता राजकीय नेत्यांनी त्याची दखल घेतली आहे. सहाय्यता निधी कक्ष तात्काळ सुरु करावा अशी मागणी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. या मागणीसाठी आज शिवसेनचे आमदार उदय सामंत मंत्रालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. याशिवाय
शिवसेना राज्यपालांना आणि मुख्य सचिवांना पत्र देणार आहे. सहाय्यता कक्ष सुरु न झाल्यास शिवसेना आंदोलनाच्या तयारीत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष बंद करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील तब्बल 5 हजार 657 रुग्णांना त्याचा मोठा फटका बसत आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यापासूनच मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचं काम थांबवण्यात आलं आहे. दरम्यान, गेल्या 5 वर्षांत मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातून 21 लाख रुग्णांना 1600 कोटी रुपयांची वैद्यकीय मदत करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.