Maharashtra Politics | राजकारणात पुन्हा भूकंप, अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा : सूत्र | ABP Majha
Continues below advertisement
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शपथविधीनंतर अवघ्या तीन दिवसातच अजित पवारांनी राजीनामा दिला आहे. अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सोपवल्याची माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अजित पवारांची मनधरणी केल्यानंतर त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र अजित पवारांच्या राजीनाम्यामुळे उद्या विश्वासदर्शक ठरावाचा पेच भाजपसमोर उभा राहिला आहे.
Continues below advertisement