Mulayam Singh Yadav यांच्या निधनानंतर BJP MLA Atul Bhatkhalkar यांनी वादग्रस्त ट्विट केलं: ABP Majha
मुलायमसिंह यादव यांच्या निधनानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी वादग्रस्त ट्विट केलंय. कारसेवकांवर गोळ्या झाडणारे मुलायम सिंह यादव यांचं निधन झालं. अयोध्येत राम मंदिराची निर्मिती ते पाहून गेले. प्रभू राम त्यांच्या आत्म्याला उत्तमगती देवो, असं भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.