Congress Meeting : काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरु, नेतृत्वबदल होण्याची दाट शक्याता

Continues below advertisement

पाच राज्यात विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरु झालीय.. या पराभवामुळे पुन्हा एकदा काँग्रेस नेतृत्वावर सवाल उपस्थित करण्यात आलाय. पुढे जायचं असेल नेतृत्वबदल आवश्यक असल्याचे शशी थरुर यांनी म्हटलं होतं. तसंच गुलाम नबी आझाद यांच्यासह काँग्रेसच्या नाराज 23 नेत्यांनीही नेतृत्व बदलाचा मुद्दा पुन्हा उपस्थित केलाय. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीत काय होणार याकडं लक्ष लागलंय. आज होणाऱ्या कोअर कमिटीच्या बैठकीत गांधी कुटुंबीय राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे..  दरम्यान मुकुल वासनिक यांना अध्यक्षपद देण्याची मागणी  G23 नेत्यांनी केलीय.. अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram