लॉकडाऊनचा निषेध करण्यासाठी राजे रस्त्यावर, भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचं भीक मांगो आंदोलन
साताऱ्यात वीकेण्ड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळत आहे. साताऱ्यातील रस्ते ओस पडले असून पोलिसांकडून नाक्यानाक्यावर तपासणी सुरु आहे. घराबाहेर पडलेल्यांची पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात आहे. तर सर्व दुकाने बंद आहेत. या लॉकडाऊनला विरोध करण्यासाठी खासदार उदयनराजे भोसलेंनी आंदोलन केलं आहे. थेट रस्त्यावर बसून राजेंनी भीक मांगो आंदोलन केलं आहे.