MNS Raju Patil on Mahayuti : मनसे आमदार राजू पाटील यांचं महायुतीवर मोठं वक्तव्य

महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप, बाळासाहेबांची शिवसेना आणि मनसेच्या प्रमुख नेत्यांची वाढलेली जवळीक पाहता, राजकीय क्षितिजावर महायुतीचा उदय होण्याचे संकेत मिळत आहेत. मनसेच्या वतीनं शिवाजी पार्क येथे आयोजित दीपोत्सवाच्या निमित्तानं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एका व्यासपीठावर एकत्र आले होते. त्याच पार्श्वभूमीवर मनसे आमदार राजू पाटील यांनी संभाव्य महायुतीवर केलेलं मोठं विधान राजकीय निरीक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. आमदार राजू पाटील म्हणाले की, आमची मनं जुळलेली आहेत, फक्त तारा जुळल्या की झालं, असं राजू पाटील यांनी म्हटलंय. राजू पाटील यांच्या या विधानाचा थेट अर्थ महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदे-फडणवीस यांच्या साथीनं राज ठाकरेही येणार असा घेण्यात येत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola