MLC Election Mahararshtra 2024 : कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतून मनसेची माघार!
कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या रिंगणातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अभिजीत पानसे यांनी माघार घेतली आहे. भाजपच्या निरंजन डावखरे आणि प्रसाद लाड यांनी शुक्रवारी सकाळी राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यानंतर मनसेकडून (MNS) काहीवेळातच अभिजीत पानसे (Abhijit Panse) हे निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले. या पार्श्वभूमीवर पूर्वाश्रमीचे मनसे नेते आणि पुणे लोकसभेतील वंचित बहुजन आघाडीचे पराभूत उमेदवार वसंत मोरे (Vasant More) यांनी मनसेला टोला लगावला. (Konkan graduate constituency)
वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये वसंत मोरे यांनी म्हटले आहे की, कोकणात जाऊन काही लोक मासे न खाताच मुंबईत परतली. या माध्यमातून वसंत मोरे यांनी अप्रत्यक्षपणे मनसेला टोला लगावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. या निर्णयावरुन मनसे आणि राज ठाकरे यांच्यावर अनेकांनी टीका केली होती. यानंतर राज ठाकरे यांनी आणखी एका निवडणुकीतून माघार घेतल्याने त्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आता वसंत मोरे यांनी केलेल्या टीकेला मनसेचे नेते काय प्रत्युत्तर देणार, हे पाहावे लागेल.
हे देखील वाचा
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला तब्बल 4 मंत्रिपदं, दादांच्या राष्ट्रवादीलाही 2, मोदी कॅबिनेटमध्ये लॉटरी लागण्याची चिन्हं!
Modi Cabinet Formula : मोदी सरकारचा मंत्रिमंडळ फॉर्म्युला समोर आला असून त्यामध्ये शिवसेना शिंदे गटाला आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला लॉटरी लागण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केंद्रात चार मंत्रिपदं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दोन मंत्रिपदं मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर रामदास आठवलेंनाही मंत्रिपद मिळणार आहे.
राज्यात भाजपचे नऊ खासदार असून त्यापैकी पाच जणांची केंद्रात मंत्रिपदावर वर्णी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.