Satyajeet Tambe : आमदार कपिल पाटील यांच्या 'शिक्षक भारती'चा सत्यजीत तांबेंना पाठिंबा
एकीकडे महाविकास आघाडीमध्ये पदवीधर निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा यावरुन एकमत होत नसताना तांबेंचं बळ मात्र वाढत चाललंय. नाशिकमध्ये जनता दल युनायटेडचे आमदार कपिल पाटील यांच्या शिक्षक भारतीने सत्यजीत तांबेंना नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आपला पाठिंबा जाहिर केलाय. जनता दल युनायटेड आणि शिक्षक भारतीच्या कार्यकर्त्यांच्या मेळावा आयोजित करण्यात आला होता. याच मेळाव्यात पाटलांनी तांबेंना बिनशर्त पाठिंबा दिलाय. यावेळी तांबे पिता पुत्र दोघंही हजर होते. या पाठिंब्याबद्दल सत्यजीत तांबेंनी कपिल पाटलांचे आभार मानलेयत. विशेष म्हणजे कपिल पाटील महाविकास आघाडीत असून सुद्धा पाठिंबा तांबेंना दिलाय.