MLA Canteen Assault | FDA परवाना रद्द असतानाही Akashwani Canteen सुरू

मुंबईतील आकाशवाणी आमदार निवास कँटीन चार दिवसांनी पुन्हा सुरू करण्यात आले आहे. आमदार संजय गायकवाड यांनी निकृष्ट दर्जाच्या जेवणावरून एका कँटीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर हे कँटीन बंद करण्यात आले होते. या कँटीनचे कंत्राट अजंता कॅटरर्सकडे आहे. विधिमंडळाच्या परवानगीनंतरच अजंता कॅटरर्सने कँटीन सुरू केल्याची माहिती आहे. मात्र, अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) कँटीनची तपासणी केली होती. या तपासणीत कँटीनमध्ये स्वच्छतेचा अभाव असल्याचे उघड झाले होते. त्यामुळे FDA ने अजंता कॅटरर्सचा परवाना रद्द केला होता. परवाना रद्द झाल्यानंतरही अजंता कॅटरर्सने आज सकाळपासून कँटीन सुरू केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. "निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याने कर्मचाऱ्याला मारहाण केली होती," असे यापूर्वीच्या घटनेबाबत म्हटले गेले होते. आता परवाना रद्द असतानाही कँटीन सुरू झाल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola