Milind Narvekar यांचं सुचक ट्विट, मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंसोबतच : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर शिंदे गटात येणार असल्याचे वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं होतं.. त्यांच्या या वक्तव्यानंतर मिलिंद नार्वेकर ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.. मात्र आता खुद्द मिलिंद नार्वेकर यांनी ट्विट करत या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केलाय... शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्याची शिवतीर्थावर जय्यत तयारी सुरु असून या कामाची पाहणी केल्याचं ट्विट नार्वेकर यांनी केलंय... शिवसेनेतील बंडानंतर मिलिंद नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संवाद कायम आहे. मुख्यमंत्री शिंदे गणपतीच्या दर्शनासाठी नार्वेकर यांच्या निवासस्थानी गेले होते. या पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटील यांनी मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात येत असल्याचं वक्तव्य केल्यानं त्याची चर्चा सुरु होती.. मात्र आता स्वतः नार्वेकर यांनी ठाकरेंच्या दसरा मेळाव्याबाबत ट्विट करुन या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केलाय...