Milind Deora Profile : CM Eknath Shinde यांच्या शिवसेनेत प्रवेश, देवरांची मतदारसंघात ताकद किती?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMilind Deora Profile : CM Eknath Shinde यांच्या शिवसेनेत प्रवेश, देवरांची मतदारसंघात ताकद किती?
मुंबई: काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी आज शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी हा प्रवेश केला. मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबईचे (South Mumbai Lok Sabha Election) माजी खासदार असून ही जागा ठाकरे गटाला जाणार हे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी आता शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश केला. मिलिंद देवरा यांच्यासोबत काँग्रेसच्या दहा माजी नगरसेवकांनाही शिंदे गटामध्ये प्रवेश केला.
मिलिंद देवरा हे काँग्रेसचे माजी खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री आहेत. दक्षिण मुंबईतून ते 2004 आणि 2014 साली निवडून आले आहेत. 2014 आणि 2019 साली त्यांना शिवसेनेच्या अरविंद सावंत यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये ही जागा ठाकरे गटाला जाण्याची शक्यता आहे. त्याचमुळे राजकीयदृष्ट्या अस्वस्थ असलेल्या मिलिंद देवरा यांनी आता शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या तिकिटावरून देवरा हे दक्षिण मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.